अक्कलकोट येथील मटका बुक्की व अड्डयावर पोलिसांचा छापा ; लाखोचा मुद्देमाल जप्त 

सोलापूर पोलीसनामा ऑनलाईन 
 सोलापूर : अक्कलकोट शहरात विशेष पथकाने टाकलेल्या छाप्यात मटका अड्ड्यावर मिळालेला लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे अवैध व्यायवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

याप्रकरणी लक्ष्मीकांत बसवणप्पा रोडगे,  प्रदीप बाळू फुटाणे,  इरफान लतिफ सातलगाव,  लतिफ हनिफ सातलगाव,  महेश मनोहर धोंगडे,  अशोक रानबा शिंदे, राम कृष्णा टोणपे,बच्चन उर्फ कासीम सिकलगार सर्व रा. अक्कलकोट यांना ताब्यात घेतले आहे .आरोपींच्या ताब्यातील मटक्याचे साहित्य, रोख रक्कम, वाहन असा एकूण 1,09,030/- रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना, शुक्रवारी रात्री 8 ते 10 वाजण्याचे सुमारास शहरात जुन्या आडत बाजारात सुरु असलेल्या मटका अड्डयावर व विजय कामगार चौकातील महेश धोंगडे याचे धनलक्ष्मी लाँटरी दुकानात विशेष पथकाने छापा टाकला. पकडलेल्या आरोपींकडे मटका मालकाबाबत चौकशी केली असता आरोपी रोडगे याने  बच्चन उर्फ कासीम सिकलगार मालक असल्याचे सांगितले.  तर आरोपी फुटाणे व टोणपे यांनी मटका बुक्की मालक सातलगाव व धोंगडे  हे असल्याचे सांगितले. वरील सर्व आरोपी विरूद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली विशेष पथकामधील सहायक पोलीस निरिक्षक संदीप धांडे, पोलीस नाईक अमृत खेडकर, पोलीस काँन्स्टेबल श्रीकांत जवळगे, अमोल जाधव, सुरेश लामजने, पांडुरंग केंद्रे, सोमनाथ बोराटे, अनुप दळवी, सचिन कांबळे, विलास पारधी, सागर ढोरे पाटील, बाळराजे घाडगे, अभिजीत ठाणेकर, महादेव लोंढे, विष्णु बडे यांनी केली.