अक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल छिंदम यांची उपमहापौर पदावरुन हकालपट्टी

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईन

शिव जयंतीवरुन अक्षेपार्ह वक्तव्य करणा-या नगरच्या भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्या वक्तव्याची क्लिप व्हयरल झाल्याने शिवप्रेमींमध्ये तिव्र संताप व्यक्त होत आहे. अक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल उपमाहपौर श्रीपाद छिंदम याची भाजप आणि उपमहापौर पदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा ऑडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. त्यामुळे संतप्त जमावाने श्रीपाद छिंदम यांच्या कार्यालयावर दगडफेक करत तोडफोड केली.

याप्रकरणी शिवसेनेचे नगरसेवक दिलीप सातपुते यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून, भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छिंदम यांनी केलेल्या वक्तव्य त्यांच्या अंगलट आले असून पक्षाने त्यांचा राजिनामा घेतला आहे. तर पक्षातून निलंबित केले आहे.

आज सकाळी छिदम यांनी बांधकाम विभागातील एका कर्मचा-याला कामासंबंधी फोन केला होता. शिवजयंती असल्याने कर्मचारी नसल्याचे बांधकाम विभागातील कर्मचा-याने सांगितले. त्यावर छिंदम यांनी शिवराय आणि शिवजयंतीबद्दल अपशब्द वारपरले. त्यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाची क्लिप व्हायरल झाल्यावर शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांसह विविध संघटना रस्तावर उतरल्या आहेत.
छिंदम यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. छिंदम यांनी पत्रकार परिषद आयोजित करुन माफी मागण्याची तयारी दर्शवली आहे.