अटक करण्यात आलेल्या बांग्लादेशींना 29 पर्य़ंत पोलीस कोठडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

बांग्लादेशातील दहशदवादी संघटना अन्सारउल्ला बांगला टिम (ABT) या संघटनेशी संबंधित असलेल्या तिघांना पुणे दहशदवादी विरोधी पथकाने अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

या तिघांकडून बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड, जप्त करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी दोघेजण बांग्लादेशातील खुलना व पुष्ककाली जिल्ह्यातील असून, अन्य एक साथीदार शरियतपूर जिल्ह्यातील बिराजकुंडी गावातील आहे.16 मार्च रोजी पुणे दहशदवाद विरोधी पथकाला शहरातील वानवडी आणि आकुर्डी भागात अनधिकृतपने राहणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांची गुप्त माहिती मिळाली होती. हे सर्वजण अन्सारउल्ला बांगला टिम या दहशदवादी संघटनेशी संबंधीत असून पुणे शहरात राहून एबीटीच्या सदस्यांना मदत करत होते. त्यानुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एटीएसने वानवडी परिसरात शोध घेत असताना प्रथम एक व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता ,आकुर्डी परिसरातील आणखी दोन बांग्लादेशींना अटक करण्यात आली. अटक केलेले नागरीक बांगलादेशी असून भारत सरकारच्या कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय बेकायदेशीरपणे शहरात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

ही कारवाई पुणे एटीएस विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनिल दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राम जाधव व त्यांच्या पथकाने केली.

‘अल् कायदा’ संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन तीन बांग्लादेशींना अटक
बातमी वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…

https://goo.gl/wSLt4C