अतिरिक्त आयुक्तपदाचा राजेंद्र निंबाळकर सोमवारी पदभार स्वीकारणार

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची राज्य शासनाने पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली केली आहे. अतिरिक्त आयुक्त पदाचा सोमवारी पदभार स्वीकारणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांची महिन्याभरापूर्वी मंत्रालयात बदली झाली होती. त्यांच्या बदली नंतर पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी कोण येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज राज्य शासनाने राजेंद्र निंबाळकर यांची पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदी बदली केली.पुण्यात येण्यापूर्वी त्यांनी उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहिले असून त्यांनी सुरुवातीच्या काळात पुणे महापालिकेच्या टॅक्स विभाग, म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या विशेषपदावर त्यांनी काम केले आहे. या सर्वांच्या कामाचा अनुभव शहराच्या विकासाला नक्कीच फायदेशीर ठरणार असून त्यांनी अगोदरच पुणे महापालिकेत काम केल्याने ते पीएमसीच्या कारभाराशी परिचित आहेत.