अनुष्कानंतर ‘ही’ अभिनेत्री लवकरच बोहल्यावर

मुंबई : वृत्तसंस्था

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचा विवाह झाल्यानंतर बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्रींच्या लग्नाचे वृत्त समोर येत आहे. सध्या सोनम कपूर हिच्या लग्नाच्या चर्चा जोरदार सुरु असतानाच श्रद्धा कपूरही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत असल्याचे समजते आहे. श्रद्धा लवकरच आपला बॉयफ्रेंड अभिनेता फरहान अख्तर याच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे.

फरहानचा हा दुसरा विवाह असून त्याने आपली पूर्व पत्नी अधुना हिच्यासोबत घटस्फोट घेतला होता. २००० साली फरहान आणि अधुना यांचे लग्न झाले होते आणि नंतर नुकताच त्यांनी घटस्फोट घेतला होता. फरहान-अधुनाच्या घटस्फोटासाठी श्रद्धाच कारणीभूत असल्याचेही म्हटले जात आहे.