अनैतिक संबंधातून तरुणाची हत्या

पैठणः पोलीसनामा आॅनलाईन
अनैतिक संबंधाच्या संशयावरुन एका युवकाची हत्या झालेली घटना आैरंगाबाद जिल्ह्यामधील पैठण तालुक्यातील खादगाव या ठिकाणी घडली आहे. मुजीब नबी शेख असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. मुजीब हा १० ऑक्टोबर २०१७ पासून बेपत्ता झाला होता.बरेच दिवस शोध घेऊनही सापडला नव्हता. आज सहा महिन्यांनी बोअरवेलमध्ये मुजीबचा मृतदेह मिळून आला आहे. मारेकऱ्यांनी मुजीबच्या मृतदेहाचे तुकडे करुन ते बोअरवेलमध्ये टाकल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवीला आहे.

मुजीब १० ऑक्टोबरपासून गावातून बेपत्ता झाल्याची तक्रार नातेवाईकांनी पाचोड पोलीस ठाण्यात केली होती. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरुन पोलिसांचे एक पथक मुजीबचा शोध घेत होते,मात्र त्यांच्या हाती कायम निराशाच लागली. यानंतर मुजीबच्या नातेवाईकांनी अनैतिक शाररिक संबंधाच्या संशयातून मुजीबसोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला होता. तसेच साहिल शेख,अफसर शेख आणि बाबर शेख या तिघांनी मुजीबला कोंडून ठेवल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल करण्यात आली.

आपल्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच तिन्ही आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने तिन्ही आरोपींचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. मुजीबचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते, यातूनच त्याची हत्या झाल्याची चर्चा गावातील लोकांमध्ये सुरु होती. मात्र आरोपींनी पोलिस चौकशी दरम्यान या घटनेची कबुली दिली नव्हती. अखेर खबऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिन्ही आरोपींनी मुजीबचा खून करुन त्याचा मृतदेह गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेपाठीमागील बोअरवेलमध्ये टाकल्याचे सांगितले.