अण्णा हजारे यांच्या आंदोलनास ‘शिवशंभु प्रतिष्ठान’चा उपोषण करत पाठिंबा

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे जन लोकपाल, लोकायुक्त व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रामलीला मैदानावर उपोषण सुरु आहे. या आंदोलनास जाहिर पाठिंबा दर्शवण्यासाठी शिवशंभु प्रतिष्ठान, कात्रज तर्फे एक दिवसीय उपोषण करण्यात आले. यावेळी सरकारने अण्णांच्या मागण्यांवर विचार करुन त्यानुसार कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या शेतमालास हमीभाव द्यावा, देशात जनलोकपाल कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. शिवशंभु प्रतिष्ठान तर्फे पुणे सातारा हायवे, कात्रज येथे एकदिवसीय उपोषण करुन अण्णांच्या आंदोलनाला जाहिर पाठिंबा देण्यात आला.

अन्ना हजारें यांच्या आंदोलनास ‘शिवशंभु प्रतिष्ठाण’तर्फे उपोषण करुन जाहिर पाठिंबा

या उपोषणात महेश सुरेशराव कदम (संस्थापक, अध्यक्ष- शिवशंभु प्रतिष्ठाण), निलेश खामकर, अमोल शेळके, शंकर यादव, माऊली गांगुर्डे, किरण खामकर, अनिल खडतरे, मंगेश खोपडे, शुभम पाटील, रोहन भिताडे, गाैरव खैरणार, राकेश वेताळ, संतोष निकम, जोतिबा काटेकर, राजू कदम, बंटी केंद्रे, अक्षय दिक्षीत, अखिल नायर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.