अन्य पक्षांपेक्षा पुण्यात शिवसेनेचे काम जोरात : मोकाटे

पुणे : पोलीसनामा अॉनलाईन 

या महिना अखेरीपर्यंत संघटना बांधणी पूर्ण करण्यावर शिवसेनेनी भर दिला आहे. नगरसेविका संगीता ठोसर आणि सविता मते यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारीणीची रचना मंगळवारी पूर्ण करण्यात आलेली आहे. याखेरीज शिवसेनेच्या गट प्रमुखांची बांधणी पूर्ण करण्याचे काम चालू असून ते लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्यापूर्वी संघटना बांधणी पूर्ण करायची आहे. दरम्यान पुणेकरांचे जे प्रश्न पुढे येतील त्यावर शिवसेनेच्या पद्धतीने आंदोलन करण्याचे धोरण ठरले आहे असे शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत मोकाटे यांनी सांगितले.

शिवसेनेच्या शहरप्रमुखपदी माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि माजी आमदार महादेव बाबर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर दोघा प्रमुखांनी संघटना बांधून रिझल्ट देण्याचे ठरवले आहे. अन्य कोणत्याही पक्षापेक्षा शिवसेनेच्या संघटना बांधणीचे काम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने चालू असल्याचे मोकाटे यांनी सांगितले. या बांधणीच्या जोरावरच शिवसेना पुण्यात प्रभावी कामगिरी करेल असे ते म्हणाले.