अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या प्रमुखासह नऊजणांविरुद्ध मोक्का

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

अमली पदार्थांची विक्री करणारी टोळीप्रमुख आरती मिसाळ हिच्यासह चार महिला व पाच पुरूष यांच्या विरूद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मिसाळ ही सराईत गुन्हेगार असुन तीचा अनेक गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा चे पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या पथकाने गोपीनाथ नवनाथ मिसाळ (वय 22 रा . इनामके मळा लोहियानगर पुणे) हुसैन पापा शेख (वय -28 रा.जाजू क्लब सैय्यदअली चाळ रुम नं.11 सांताक्रुझ मुंबई) या दोघांना अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी आरती महादेव मिसाळ उर्फ आरती विशाल सातपुते उर्फ आरती मुकेश चव्हान (वय 27 रा. इनामके मळा लोहियानगर पुणे) पुजा महादेव मिसाळ उर्फ पुजा जोतिबा तांबे(वय 32 इनामके मळा लोहियानगर पुणे) निलोफर हयात शेख (वय 27 रा 152 सहकारनगर पुणे) अजहर उर्फ चुहा शेख वय -24 रा.512 सहकारनगर पुणे,राॅकिंसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय 23 रा. रामटेकडी हडपसर पुणे) यांचा शोध घेऊन त्यांना दिनांक 7 रोजी पकडण्यात आले होते. त्यांच्या सर्वांच्या ताब्यातून एकुन शंभर ग्रॅम ब्राऊन शुगर (हेराॅईन) व दाेन किलो पन्नास ग्रॅम चरस असा सहा लाख रुपयांचा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला आहे.
आरोपी अमली पदार्थ आयशा उर्फ आशाबाई पापा शेख व जुलैबी पापा शेख दोघी (रा.मुंबई) यांच्या कडून खरेदी करत असल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या या दोघी फरार झाल्या असून त्यांचा शोध सुरु.
वरील गुन्ह्यातील मुख्य आरोपी मिसाळ ही टोळीप्रमुख आहे ती इतर आरोपींच्या मदतीने सावज हेरून अोळखीच्या व्यक्तींना अमली पदार्थाची विक्री करत असे. विशेषतः तरुण मुले तिचे प्रमुख ग्राहक होती. त्यामुळे अनेक तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. तिने कमविल्याल्या या व्यावसायातून अनेक ठिकाणी प्लॅट, जागा, वाहने खरेदी केल्याची माहिती पोलीसांना मिळालेली आहे. आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेली रोख रक्कम, दागिने, व वाहने अमली पदार्थाच्या विक्रीतून खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांच्याकडून ब्राऊन शुगर (हेराॅईन) , चरस या अमली पदार्थासह एक स्पीप्ट कार,एक अॅक्टिव्हा , रोख रक्कम सोन्याचे दागिने असा एकूण सहा लाख एेंशीहजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही.आरोपी आरती मिसाळ हिच्या विरुद्ध यापूर्वी देखील खडक व पिंपरी पोलीस ठाणे या ठिकाणी ब्राउन शुगर विक्रीचा एक गुन्हा दाखल आहे. तसेच आरोपी अजहर उर्फ चुहा हयात शेख याच्यावर खडक पोलीस ठाणे या ठिकाणी मारामारी व घरफोडीचा गुन्हा दाखल असुन त्याला 2014 साली एक वर्षा करता तडीपार करण्यात आले होते. आरोपी निलोफर हयात शेख ही सदर व्यावसायातून मिळालेला बेकायदेशीर पैसा सावकारकी व्यावसायात गुंतवत होती तिच्या विरोधात देखील खडक पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल आहे.
राॅकिसिंग कल्यानी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध वानवडी पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न व दंगा निर्माण करणे असे गुन्हे दाखल आहेत.तसेच त्याच्या विरोधात अनेक वेळा रोग्य प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली आहे.
सर्व आरोपींनी आरती मिसाळ हिच्या नेतृत्वाखाली टोळीचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी गुंडगिरी व दहशतीचा वापर करून, अंमली पदार्थ विक्रीचे गंभीर गुन्हे केलेले आहेत. त्यांच्याविरुद्ध मोक्का कायदा अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्याबाबत त्यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा सन १९९९चे कलम ३ (१) (२), (३), (४) प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार सर्व आरोपीविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलीे. सर्व आरोपींच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहे व अवैध व्यवसाय करणाNयांवर अशाप्रकारे कठोर व कडक कारवाई करण्याचे संकेत पोलिसांनी दिलेले आहेत.
डॉ. बसवराज तेली पोलीस उपआयुक्त, परिमंडळ – १ पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार खडक पोलीस स्टेशन पुण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी व संभाजी शिर्वेâ पोलीस निरीक्षक (गुन्हे) व पोलीस उपनिरीक्षक आनंत व्यवहारे, संजय गायकवाड व पोलीस कर्मचारी महेश बारवकर, महेश कांबळे, अनिकेत बाबर यांनी आरोपींना पकडले होते. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त किशोर नाईक हे करत आहेत.