निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीकडून अल्पवयीन तरुणाचे लैंगिक शोषण

शिल्पा माजगावकर : पोलिसनामा ऑनलाईन
कोल्हापूर : निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने अल्पवयीन मुलाचे लैंगिक आणि शारीरिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलिस ठाण्यात या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. आरोपी तरुणी मनाली मधुकर शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने एका अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली आहे.

कामाच्या निमित्ताने पीडित अल्पवयीन तरुण शिंदे कुटुंबाकडे तीन-चार वर्षांपासून राहत होता. मात्र तो घरी आला, त्यावेळी त्याच्या अंगावर जखमा आढळल्याने आईने त्याच्याकडे चौकशी केली, तेव्हा सुरुवातीला त्याने ही बाब लपवली. अखेर आपलं मानसिक, लैंगिक आणि शारीरिक शोषण केल्याचे मुलाने सांगितले, असा दावा त्याच्या आईने केला आहे.

पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास सुरुवातीला टाळाटाळ केली, मात्र अखेर बुधवारी रात्री गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण करणाऱ्या कलम 7, 8 अंतर्गत तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण

कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या आलिशान अपार्टमेंटमध्ये पत्नी आणि मुलीसह पोलीस उपाधीक्षकसह राहतो. २०१२ मध्ये त्याची मुलगी मनाली परिसरातील बागेमध्ये बसली असताना पीडित मुलगा आईसोबत भंगार गोळा करण्यासाठी आला होता. बागेत खेळताना या दोघांची ओळख झाली. मुलीने वेफर्सचे पाकीट खायला देण्याचे आमिष दाखवून त्या मुलाला घरी नेले. यावेळी मुलीने त्या मुलाला घरी ठेवण्याचा आग्रह धरल्याने नाईलाजाने त्या पोलीस अधिकाऱ्याने मुलगा दत्तक घेतो असं सांगून जबरदस्तीने स्वतःच्या घरात ठेवून घेतले. यावेळी मनालीने पीडित मुलाचा शारीरिक आणि मानसिक छळ करून त्याच्या गुप्तांगासह पाठीवर लायटरने असंख्य चटके दिले असून जिन्यावरून ढकलून, भिंतीवर डोके आपटून मारहाण केली असल्याचा आरोप पीडित मुलाच्या आईने केलं आहे.

काय म्हणाली पीडित मुलाची आई
मुलाने या सर्व त्रासाची माहिती आरोपी मुलीच्या आईला दिली. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. हा मुलगा गेली सहा वर्षे त्रास सहन करीत राहिला. त्याच्या डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत असंख्य जखमा आहेत. आणखी काही दिवस तो या दाम्पत्याच्या सहवासात राहिला असता तर त्याच्या जिवाचे बरेवाईट झाले असते. अखेर ‘चाईल्डलाईन’ संस्थेने या मुलाची सुटका केल्यानंतर ही धक्कादायक घटना उजेडात आली. सध्या हा पीडित मुलगा बालकल्याण संकुल इथे आहे.

“या पीडित मुलाची आई पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली असता पोलिसांनी त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही. अखेर सामाजिक कार्यकर्ते दिलीप देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्यावर प्रशासन जाग झाले. या सर्व प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केलीय.”
प्रियदर्शनी चोरगे (अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती)

”याप्रकरणी शासकीय पुरुष राज्य निरीक्षक गृहाच्या समुपदेशक अश्विनी अरुण गुजर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . मनाली मधुकर गुजर वर भा. दं. वि. स. मारहाण (कलम ३२६), बाललैंगिक अत्याचार (५०४, ७ व ८), बाल न्याय अधिनियम (७५) नुसार गुन्हा दाखल केला.”
– दिलीप देसाई

“पीडित मुलाच्या लैंगिक अत्याचाराला मुलीसह तिचे आई-वडीलही तितकेच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, असे समुपदेशक अश्विनी गुजर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.”
प्रशांत अमृतकर (पोलीस उपअधीक्षक)

पीडित मुलाला कुख्यात आरोपीसारखी वागणूक
या अल्पवयीन मुलाची आज वैद्यकीय चाचणी करण्यासाठी त्याला आज सीपीआर रुग्णालयात आणण्यात आले, त्या वेळी पोलिसांनी त्याला एखाद्या कुख्यात आरोपीला आणताना त्याचे तोंड बांधून आणल्याने पोलिसांच्या या कृत्य बदल संताप व्यक्त होत आहे, हे प्रकरण अंगाशी येत असा अंदाज येताच पोलीस अधिकारी आणि त्याची मुलगी बेपत्ता झाली आहेत.