अवघे 60 रूपये घेऊन लग्न करायला निघाले होते प्रियकर प्रेयसी

औरंगाबादः पोलिसनामा ऑनलाईन

सैराट चित्रपटाला शोभेल अशीच काहीशी ही घटना आहे एका प्रेमीयुगलाची. परतूल तालुक्यातील एक प्रेमीयुगुल घरच्यांना न सांगता पळून जाऊन लग्न करायला निघाले होते. या प्रेमीयुगुलाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांचे मनपरिवर्तन करत पालकांच्या स्वाधीन केले आहे. पोलिसांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे दोघांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. पोलिसांनी केलेल्या कामामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

युवतीच्या आई-वडिलांचा लग्नास विरोध असल्यामुळे घरातून पळून आलेल्या परतूर तालुक्यातील जोडप्याला लग्ना आधीच गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेतले. मागील सहा महिन्यांपासून त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. मुंबईला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत आष्टी पोलिसांच्या स्वाधीन केले. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे दोघेही सर्वसामान्य कुटुंबातील असून घरातून बाहेर पडताना त्यांच्याकडे केवळ ६० रुपये होते.

एकाच महाविद्यालयात शिकत असताना आॅगस्ट २०१७ मध्ये १७ वर्षीय मुलगा व मुलीचे प्रेमसंबंध जुळले. काही दिवसापूर्वी मुलीच्या घरच्यांना या दोघांच्या प्रेमप्रकरणाचा सुगावा लागला. त्यामुळे कुटुंबीय विवाहाची तयारी करत असल्याचे तिने प्रियकराला कळवले. त्यामुळे दोघांनी गाव सोडण्याचा निश्चय करून तो प्रत्यक्षात उतरवत होते. रात्री युवकाने युवतीच्या मोबाइलवर संपर्क केला ठरल्याप्रमाणे दोघेजन सेलू रस्त्यावर भेटले. कुटुंबीयांना हे दोघे फरार झाल्याची माहिती मिळताच त्यांचा शोध सुरू केला.आष्टीच्या पोलिसांनीही युवकाशी संपर्क साधत आई-वडिलांना समजावतो, असे सांगितले जोडप्याचे मनपरिवर्तन करत मुकुंदवाडी रेल्वे स्थानकावर उतरण्यास सांगितले.

ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे,आष्टी ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद इजपवार पोलिस नाईक सुधाकर राठोड, विजयानंद गवळी, योगेश गुप्ता,लाल खा पठाण, नंदलाल चव्हाण, सिद्धार्थ थोरात, धर्मराज गायकवाड, नितीन धुळे, संजीवनी शिंदे आणि शेख सुल्ताना महिला दक्षता समितीच्या सुप्रिया चव्हाण व राजश्री पोपळे यांनी केली.