अवयवदान हे वैद्यकीय संशोधनाने दिलेले वरदान – डाॅ अजय चंदनवाले

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन 

अवयवदान हे वैद्यकीय संशोधनाने दिलेले वरदान अाहे. मरावे परी अवयवरुपी उरावे. या उक्तिप्रमाणे ब्रेनडेथ झालेल्या रुग्णांकडून गरजू रुग्णांना अवयवदान केले जाते. ज्याला अवयवदान केले जाते त्यांचे आयुष्य वाढते. आणि ज्या ब्रेनडेथ रुग्णांचे अवयव दिले जातात त्यांच्या नातेवाईकांनाही रुग्णाचा पुनर्जन्म झाल्यासारखे वाटते. असे मत ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. अजय चंदनवाले यांनी ससूनच्या 44 व्या वार्षिक संशोधन परिषदेत मांडले.

नागपूर विद्यपीठाचे माजी कुलगुरु डाॅ. एस.एन.पठाण यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी पठाण म्हणाले की, संशोधन हा शिक्षणाबरोबर आवश्यक पैलू आहे. यावर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल विजेत्यांनी सरफॅडीएन रिदमचा शोध लावला आहे. या यशामागे ध्यास हा एकमेव घटक कारणीभूत असून, बी.जी.महाविद्यालय व ससून रुग्णालय ही जागतिक पातळीवर संशोधन करणारी संस्था आहे.

यावेळी परिषदेस डाॅ. दिलीप कदम, डाॅ नीला आैंधकर, डाॅ.राजेश उमप, डाॅ. सचिन बागले, डाॅ.पद्मसेन रणबागले, डाॅ. सर्फराज पठाण, डाॅ. सोमनाथ सलगर डाॅ. ईब्राहीम अन्सारी यांसह अादी मान्यवर उपस्थित होते.