’या’ 5 अवयवांना सतत हात लावणं ठरू शकतं संक्रमणाचं कारणं, ’अशी’ घ्या काळजी

अवयवांना सतत हात लावणं ठरू शकतं संक्रमणाचं कारणं कोरोना असो की, इतर संसर्गजन्य आजार, हे टाळण्यासाठी आपण स्वता काळजी घेणं गरजेचं असते. वैयक्तिक स्वच्छता आणि काही वाईट सवयी याकडे लक्ष दिले पाहिजे. तरच हा संसर्ग टाळता येऊ शकतो. शरीराच्या काही अवयवांना सतत आणि कारण नसताना स्पर्श केल्याने विविध आजार उद्भवू शकतात. कोणत्या अवयवांना सतत हात लावणे टाळले पाहिजे तसेच कोणती काळजी घ्यावी, ते जाणून घेवूयात…

हे आहेत ते अवयव

नाक
1 नाकात बोटं घालण्याची सवय सोडून द्या. कारण नाकामार्फत एखादा विषाणू, शरीरात प्रवेश करू शकतो.

2 कान
कानात बोटं घालण्याची सवय सोडून द्या, कारण यामुळे संसर्ग होऊ शकतो.

3 तोंड
जेवल्यानंतर दातांमध्ये अडकलेलं अन्न बोटांनी काढू नका. यामुळे हातावरील अनेक विषाणू तोंडात प्रवेश करू शकतात. ब्रश, पाणी किंवा माऊथ वॉशने तोंड स्वच्छ करा.

4 ओठ
महिलांना ओठांना स्पर्श करण्याची जास्त सवय असते. यामुळे ओठांच्या त्वचेचं नुकसान होतं. हात स्वच्छ धुतलेले नसतील तर हातावरील जंतू तोंडात जाण्याची शक्यता असते.

5 डोळे
उगाचच डोळ्यांना हात लावू नका किंवा डोळ्यांतील घाण बोटांनी स्वच्छ करू नका. यासाठी रूमाल वापरा. डोळे चोळण्याची सवय बंद करा. कारण हातांवरील धुळ किंवा किटाणू डोळ्यात प्रवेश करू शकतात.