आग लागल्यास पंखे होणार बंद

नागपूर :पोलिसनामा ऑनलाईन

नागपुरातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प मेट्रो रेल्वेच्या कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे.स्वयंचलित मेट्रो रेल्वेसह स्टेशनवरील वस्तूही स्मार्ट असणार आहे. याचाच एक भाग म्हणून स्टेशनवर बसविण्यात येणारे पंखे ‘हाय वोल्युम लो-स्पीड’चे असतील. ऊर्जेची कमीत कमी बचत करीत, आग लागल्यास ९० सेकंदात पंखे बंद होणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.

मेट्रो रेल्वेमध्ये सुमारे ६५ टक्के ऊर्जाच्या माध्यमातून वापरण्यात येणार आहे. ऊर्जाबचतीचे एकाहून एक उपाय शोधून काढण्यात येत आहे. ‘हाय वोल्युम लो-स्पीड’ (एचव्हीएलएस) पंखे मेट्रो स्टेशनवर बसविण्यात येत आहेत. विजेचा वापर कमी होणार असल्याने बचत होणार असल्याचा दावा महामेट्रोने केला आहे. या पंख्यांमध्ये आधुनिक डी.सी. (डायरेक्ट करंट) मोटरचा वापर होत असल्याने यात गेयर बॉक्स’ची गरज पडत नाही. यामुळे आवाज तर कमी होतोच, शिवाय विजेची बचतदेखील मोठ्या प्रमाणात होते. या एचव्हीएलएस पंख्याचा व्यास १० मीटर असून, या एका पंख्यांमुळे सुमारे २७०० चौरस फूट परिसर हवा खेळती राहते.