आणखी एक बँक घोटाळा ; रोटोमॅक कंपनीचा मालक ८०० कोटी घेऊन पळाला

कानपूर : देशामध्ये सुरू झालेली बँक घोटाळ्याची मालिका काही संपता संपेना. पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी घोटाळा समोर आला आहे. रोटोमॅक या कंपनीचे मालक विक्रम कोठारी विविध प्रकारच्या पाच सरकारी बँकांचे ८०० कोटी रुपयांचे कर्ज घेऊन फरार झाले आहेत.

विक्रम कोठारी यांनी अलाहाबाद बँक, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ बडोदा, इंडियन ओवरसीज बँक आणि यूनियन बँक आॅफ इंडिया या बँकांकडून हे कर्ज घेतले आहे. यूनियन बँकेकडून त्यांनी ४८५ कोटींचे कर्ज घेतले असून अलाहाबाद बँकेकडून ३५२ कोटींचे कर्ज घेतले आहे. वर्षभरापासून त्यांनी व्याज वा मूळ कर्ज परत केलेले नाही. कानपूरमधील मध्यवर्ती भागातील कोठारी यांचे कार्यालय मागील आठ दिवसापासून बंद आहे. मात्र तेव्हापासून कोठारी हे कोठे आहेत याबाबतत माहिती नाही