आता नीट परीक्षेसाठी ही ड्रेस कोड

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

जर तुमचा पाल्य नीट ची परीक्षा देणार असेल तर, तुमच्यासाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. 6 मे रोजी होणाऱ्या नीटच्या परीक्षेसाठी सीबीएसईनं ड्रेसकोडच्या संदर्भात महत्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी फिकट रंगाचे हाफ स्लिव्सचे कपडे घालून येण्याची सुचना देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या सर्व सुचना वाचूनच परिक्षा केंद्रावर यावं, असं आवाहन देखील सीबीएसईने केले आहे. मागील वर्षी नीट परिक्षेच्या वेळी ड्रेस कोडवरून मोठा वाद निर्माण झाला होता. यामुळे परिक्षेच्या अगोदरच विद्यार्थ्यांसाठी ड्रेस कोडसंदर्भात महत्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नीट च्या परीक्षा केंद्रावर जाताना ही घ्या काळजीः

  • परीक्षेसाठी जाताना फिकट रंगाचे हाफ स्लिव्सचे कपडे परिधान करुन जा.
  • कपड्यांना कोणत्याही प्रकारची बटनं नसावीत.
  • कोणत्याही प्रकारचे दागिने किंवा अॅक्सेसरीज घालून जाऊ नका.
  • परीक्षेच्या दिवशी बूट घालून जाण्सास बंदी आहे. तर स्लीपर्स किंवा लहान हिल असलेला सॅंडल घालण्यास परवानगी देण्यात आली आहे.
  • बुरखा, पगडी यांच्यासारखे धर्माशी संबंधित असलेले कपडे परिधान करणाऱ्यांनी परीक्षेच्या एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणं गरजेचं आहे.
  • विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची स्टेशनरी किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत आणू नये. विद्यार्थ्यांना पेन, पेन्सल, पाण्याची बाटलीदेखील परीक्षा केंद्रात आणता येणार नाही
  • विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेलं प्रवेश पत्र न विसरता सोबत घ्यावे, कारण विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राशिवाय परीक्षा देता येणार नाही..