आता ससूनमध्ये ही होणार यकृत प्रत्यारोपण

पुणेः पोलीसनामा आॅनलाईन
यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयाला परवानगी मिळावी यासाठी शासनाकडे अर्ज करण्यात आला होता. या प्रक्रियेला आता हिरवा कंदिल दाखवण्यात आला असून लवकरच ससून रुग्णालयामध्ये देखील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणे शक्य होणार आहे. या अगोदर रुग्लणालयामध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आलेली आहे.