आमदार गाडगीळ यांनी सुरू केल्या ‘टॉकींग पॉईंट’ बैठका

पुणे: पोलीसनामा ऑनलाइन
राजेंद्र पंढरपुरे

पुण्यातील कॉँग्रेस कार्यकर्त्यांशी ‘डोअर टू डोअर’ गाठीभेटी घेण्याची घोषणा आमदार अनंतराव गाडगीळ यांनी दोन महिन्यांपूर्वी केली होती. याविषयी बोलताना गाडगीळ यांनी सांगितले कोणताही गाजावाजा न करता विधीमंडळ अधिवेशनापूर्वीच मी हा कार्यक्रम सुरू केला आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघातील १०० जुन्या आणि सक्रीय कार्यकर्त्यांची बैठक घेतली आणि भाजप सरकारविरोधातील ५० मुद्दे तसेच काँग्रेस पक्षाची बाजू मांडणारे मुद्दे मी त्यांना दिले. या मुद्द्यांच्या आधारे कार्यकर्त्यांनी लोकांशी चर्चा करावी अशी अपेक्षा आहे. अशा टॉकींग पॉईंट बैठका आठही विधानसभा मतदारसंघात घेणार असून जूनपूर्वी हा कार्यक्रम संपेल दरम्यान सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जायचे,अर्धा तास चर्चा करायची असा माझा कार्यक्रम सुरू आहे.

रास्ता पेठेत एका हॉटेलमध्येच काल (शनिवारी) सर्व कार्यकर्ते जमले. तिथेच भेटीगाठी झाल्या. या भेटीगाठींबरोबरच आमदार म्हणून तीन वर्षे मी केलेल्या कामाचा अहवाल पुणेकरांना पाठविण्यास सुरूवात केली आहे. या उपक्रमांत कार्यकर्ते भावना व्यक्त करतात. लोकांच्या समस्याही समजतात असेही गाडगीळ यांनी सांगितले.