आयटी तज्ज्ञ पंकज घोडे यांचे दिल्ली पोलिसांना क्रिप्टोकरन्सी संदर्भात मार्गदर्शन

दिल्लीः पोलीसनामा आॅनलाईन
क्रिप्टोकरंसी विषयी फसवणूक झाल्याचे अनेक गुन्हे राजधानी दिल्लीत दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी डिजीटल करन्सी या विषयावर आधारीत सत्राचे आयोजन करण्यात आले होते. दोन तासाच्या या चर्चा सत्रात ग्लोबल ब्लॉकचेन फाऊंडेशनचे संचालक पंकज घोडे यांनी पोलिस आयुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलिस उपायुक्त या दर्जाच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

याप्रसंगी भारतातील क्रिप्टोकरन्सीच्या संभाव्य धोक्यासंदर्भात घोडे यांनी अतिशय सोप्या आणि साध्या भाषेत माहिती दिली. हा विषय तसा क्लिष्ट असल्यामुळे तो समजून घेण्यासाठी आणखी काही सत्रांची आवश्यकता आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने मागील तीन महिन्यात तीन क्रिप्टोकरन्सीद्वारे फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासंदर्भात काम केले आहे. मागील आठवड्यात दोन व्यक्तींना RHF आणि RHFGOLD या क्रिप्टोकरन्सी मार्फत फसवणूक केल्याप्रकरणी अटक केली आहे. मात्र ते रशियाच्या रेनसेफ्ट येथील प्रिमियर पेट्रोलियम कंपनीशी संबंधित असल्याचा दावा केला आहे.

 

क्रिप्टोकरंसी संदर्भातील सत्रांसाठी उपस्थित असलेले सहपोलिस आयुक्त म्हणाले की, क्रिप्टोकरन्सीचा उगम, त्याचे इतर देशातील नियमन, तसेच फसवणूकीचे प्रकार याबाबत आम्हाला माहिती देण्यात आली. तर एक उपायुक्त म्हणाले, हा क्लिष्ट विषय आहे. मात्र यासाठी तांत्रीक नैपुण्य लागते. आम्हाला आणखी काही सत्रांमध्ये याबाबत माहिती देण्याची गरज आहे.

यावेळी घोडे यांनी क्रिप्टोकरन्सी बाबतच्या अनेक मुलभूत गोष्टींचे विश्लेषण केले. तसेच पोलीसांकडे असे एखादे प्रकरण पहिलांदा आल्यास काय करावे. हे ही प्रथम त्यांच्याकडून सांगण्यात आले.