आशियाना एकांकिका स्पर्धेत सनऑरबीट सोसायटीने काय मिळवले

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

कला क्राफ्ट आयोजित आशियाना एकांकिका स्पर्धेत सनऑरबीट सोसायटीने सादर केलेल्या ‘आस एका पहाटेची’ या एकांकिकेला चार बक्षिसे मिळाली. ही स्पर्धा 27 ते 31 जानेवारी दरम्यान यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात घेण्यात आली होती. या स्पर्धेतील विजेत्यांना शनिवारी (दि.17) अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

सोसायटी अंतर्गत घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये पुण्यातील 27 सोसायटींनी भाग घेतला होता. 500 हून अधिक कलाकारांनी या स्पर्धेत आपली कला सादर कोली होती. आनंदनगर येथील सनऑरबीट सोसायटीने प्रथमच या स्पर्धेत भाग घेऊन ‘आस एका पहाटेची’ ही एकांकिका सादर केली होती. या एकांकिकेत काम करणारे निशिकांत नाडगौडा यांना जेष्ठ कलाकाराचे प्रथम बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यासह इतर तीन बक्षीसे ‘आस एका पहाटेची’ या एकांकिकेला मिळाली.

योगेश कुलकर्णी यांना पुरुष विभागातील सहकलाकाराचे प्रथम पारितोषीक मिळाले. तर शिस्तबद्ध संघ म्हणून प्रथम क्रमांकाचे पारितोषीक सनऑरबीट सोसायटीला देण्यात आले. तसेच सांघीक स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षीसही सोसायटीने पटकावले.

महालक्ष्मी लॉन्स येथे पार पडलेल्या बक्षीस वितरणास सनऑरबीट सोसायटीचे विठ्ठल हनमघर, अभिजित डांगरीकर, सुनील मोरे, लता गिल्डा, श्रद्धा विधाते, दिपाली खिरोडकर, अमृता पाटील, कल्पना उंदुरे, श्रद्धा दुधाने, आभा डांगरीकर, संध्या पाटील, नेहा रेड्डी, अमिता टिपरे, विद्या गुंजाळ, अमृता पाटील, सरोज जवालकोट, वंदना व्यवहारे, रजनी पाटील, राजश्री सराफ, याशमिनी पवार, प्राजक्ता कुलकर्णी, मुक्ता तांबे, संगीता कुलकर्णी, गीता जेडीया. सोसायटीतील लहान मुलांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

सनऑरबीट सोसायटीच्या वतीने या स्पर्धेमध्ये खालील कलाकार सहभागी झाले होते…

निशिकांत नाडगौडा, योगेश कुलकर्णी, सतीश विधाते, अमित देशपांडे, कैलास नावंदर, क्षितिज कुलकर्णी, विकास दळवी, घनश्याम कुलकर्णी, अर्चना कुलकर्णी, दिपाली पत्की, दिपाली दळवी

बॅक स्टेज कलाकार – पायल गोडबोले, राजश्री देशपांडे, सचिन हनमघर