इंदापूर : रेड्यात दोन कुटुंबात रस्त्यावरून राडा, परस्पर विरोधी गुन्हे दाखल

इंदापूर : रेडा (ता.इंदापूर) येथे जुण्या रस्त्याच्या वादावरून दोन कुटुंबात मारहाण व शिवीगाळ घटना घडली असुन दोघांनीही इंदापूर पोलीसात परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या असुन एका कुंटुबातील चार व्यक्तीवर अट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.तर त्यांचे विरोधी कुटुंबातील तब्बल 19 जणाविरोधात मारहान व चार तोळे दागीने ओढुन नेल्याबाबत फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असल्याने रेड्यात जुण्या रस्त्याच्या वादातुन दोन कुटुंबात मारहाण व शिवीगाळ राडा झाला असल्याची माहीती इंदापूर पोलीसांनी दीली आहे.

याबाबची फिर्याद अहीलाजी भगवान माने (वय42) रा.रेडा,ता.इंदापूर,जि.पूणे यांनी इंदापूर पोलीसात तक्रार दीली असुन त्यात म्हटले आहे की 12 जुलै 2020 रोजी दुपारी 12:30 वा सुमारास फिर्यादी हे मौजे रेडा येथे गावातील अंतर्गत रस्त्यावरून जात असताना गावातील कैलास सुखदेव पवार,सुखदेव तुकाराम पवार,सुरेश सुखदेव पवार व अंबीका साळुंखे रा. सर्व रेडा,ता.इंदापूर,जि.पूणे.यांनी फिर्यादी यांना ए चांभारड्या तु या रस्त्याने जायचे नाही,हा रस्ता आमचा आहे.तुला कीतीवेळा सांगीतले आहे या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केल्याची फिर्याद इंदापूर पोलीसात दीली आहे.

तर फिर्यादी कैलास सुखदेव पवार (वय35) रा.रेडा,ता.इंदापूर,जि.पूणे यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दीली असुन त्यात आहे की दि.12 जुलै रोजी रात्री 8 वा.चे सुमारास फिर्यादी हे कुटुंबासह घरात जेवण करत असताना गावातील अहिलाजी भगवान माने,विशाल सिताराम माने,व सिताराम तुकाराम माने यांचेसह 19 जणांनी मीळुन फीर्यादीचे घरात घुसुन त्यांचे वडील सुखदेव पवार,सुरेश पवार व बहीण अंबीका साळुंखे हीस काठीने, लाथा बुक्यानी मारहाण करत शिविगाळ व दमदाटी करून अहिलाजी माने याने फिर्यादीचे गळ्यातील दोन तोळ्याचे लाॅकीट व विशाल माने याने फीर्यादीची बहीण अबींका साळुंखे हीच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मणी मंगळसुत्र ओढुन नेले असुन बहीण अंबीकाच्या अंगला झोंबाझोबी करून तीच्या मनात लज्जा उत्पन्न होइल असे कृृत्य केले असले बाबत तब्बल 19 जणांविरोधात इंदापूर पोलीसात फिर्याद दीली आहे.

वरील दोनही तक्रारीची इंदापूर पोलीसांनी नोंद केली असुन यामध्ये कैलास पवार सह एकुण चारजणांवर अणुसुचित जाती-जमाती प्रतिबंध (अट्राॅसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.तर त्यांचे परस्पर विरोधी अहिलाजी भगवान माने यांचेसह 19 जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असुन अट्राॅसिटी गुन्ह्याचा तपास बारामती पोलीस उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर हे करत आहेत.तर मारहाणीच्या गुन्ह्याचा तपास इंदापूर पोलीस करत आहेत.