एअर इंडियाचे अधिकृत ट्विटर हँडल हॅक

एअर इंडिया या विमान कंपनीचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक करण्या आले आहे. ही घटना मध्यरात्री उशिरा घडली. एअर इंडियाच्या विमानांची सगळी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, आम्ही आता तुर्किश एअरवेजसोबत आहोत असे सांगणारे संदेश ट्विट म्हणून पडू लागले तेव्हा हे अकाऊंट हॅक झाल्याचे समजले. ‘लास्ट मिनिट इंपॉर्टटंट अनाऊन्समेन्ट’ या नावे हा संदेश पिन करण्यात आला आहे. @airindiain या नावे असलेले हे ट्विटर हँडल नंतर @airindiaTR या नावाने हॅकर्सनी बदलले आहे.