एकतर्फी प्रेमातून तरुणाच्या छळाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

औरंगाबादः पोलीसनामा आॅनलाईन
एकतर्फी प्रेमातून तरुणाच्या छळाला कंटाळलेल्या अठरा वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना कन्नड तालुक्यातील वडनेर गावात काल बुधवारी घडली. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात कन्नड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील तीन वर्षांपासून आरोपी तरुण हा तरुणीचा सतत छळ करत होता. बुधवारी मात्र आरोपीने तरुणीचा पाठलाग करून तिची छेड काढली होती. या रोजच्या त्रासाला कंटाळून तरुणीने घरी आल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली.