एक लाखाची लाच घेताना परभणीचे उपजिल्हाधिकारी अटकेत

परभणीः पोलीसनामा ऑनलाईन

परभणीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना १ लाख रूपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. सुदर्शन गायकवाड असे त्या उपजिल्हाधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी 44 वर्षीय शेत-याने लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती.

ब्राह्मण गाव येथील शेतकऱ्यांची जमीन संपादित केलेला अहवाल पाठवण्यासाठी शेतकरी आणि तत्कालीन अभियंत्याला दोन लाख रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीमध्ये एक लाख रुपये देण्याचे ठरले. स्वतःच्या दालनातच लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले.

याबाबत मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.