एमटीपी किट ऑनलाइन खरेदीवर बंदी आणावी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे शहरात सद्य स्थितीला एमटीपी किटची ऑनलाइन खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. या ऑनलाइन खरेदी बंदी आणण्याची गरज असून या बाबत एफडीएकडे मागणी करण्यात आल्याची माहिती केमिस्ट असोसिएशनचे सचिव विजय चंगेडिया यांनी दिली.

यावेळी केमिस्ट असोसिएशनचे दत्त प्रसाद टोपे, राहुल देशपांडे, प्रसन्न पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी विजय चिंगेडिया म्हणाले की, शहरातील विविध भागात एमटीपी किटची खरेदी ऑनलाइनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होत आहे. औषध खरेदी करताना मेडिकलमध्ये डॉक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय कोणतेही औषध दिले जात नाही. मात्र एमटीपी किटची खरेदी आता ऑनलाइन पद्धतीने कोणत्याही प्रकारची चिठ्ठी न पाहता दिली जात आहे. त्यामुळे या ऑनलाइन खरेदीमुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. याची दक्षता घेण्याची गरज असून याकडे सरकार आणि प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. हे लक्षात एमटीपी किट ऑनलाइन खरेदी होता कामा नये. अशी मागणी एफडीएकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले.