ओला आणि उबेर कॅब जाणार संपावर

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन
टॅक्सीनंतर लोकप्रिय असलेली ओला, उबेर सेवा तुम्हाला गुढी पाडव्याच्या दिवशी घेण्यास अडचणी येणार आहेत. उद्या मुंबईत मात्र, ओला उबेरची सेवा सुरू राहणार आहे किंवा नाही हे उद्याच समजेल.

दिल्ली, मुंबईसह काही शहरातील लोकांना गुढीपाडव्याला अडचण होण्याची दाट शक्यता आहे. ओला आणि उबेरचे ड्राईव्हर पुन्हा एकदा डिव्हाईस बंद करून विरोध प्रदर्शन करणार आहेत.

गुढीपाडव्याच्या दिवशी ओला आणि उबेरची सेवा ग्राहकांना मिळणार नाही, असं म्हटलं जात आहे. ओला-उबेरचे चालक सकाळी आठ पासून आपले डिव्हाईस बंद करुन आपला विरोध व्यक्त करणार आहेत. कर्ज काढून गाडी घेऊन काम करणाऱ्या चालकांना लोनचा हप्ता देखील भरणे कठीण झाले असल्यामुळे, त्यांच्या गाड्या बँकेकडून जप्त होत आहेत.

चालक कमी रेटिंगच्या ड्राईव्हरची पुन्हा नियुक्ती करावी आणि वाहनानुसार भाडे निश्चित करावे, अशा विविध मागण्यासाठी कामबंद आंदोलन करणार आहेत. फक्त मुंबईमध्ये ४५ हजारच्याही वर कॅब आहेत.