औरंगाबादमध्ये कारखाली चिरडून खून करणाऱ्या मित्राला पोलीस कोठडी

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन
मैत्रिणीशी बोलण्याच्या कारणावरून संकेत कुलकर्णीला आरोपीने कारखाली चिरडून मारले होते. याप्रकरणी आरोपी संकेत प्रल्हाद जायभाये याला ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. ही घटना २४ मार्चला घडली होती.

संकेत प्रल्हाद जायभाये याने चार चाकी गाडीने संकेत कुलकर्णी आणि त्याच्या अन्य दोन मित्रांनाही कारखाली चिरडण्याचा प्रयत्न केला होता. जायभायेने स्वत:च्या मोबाईलमधील सीमकार्ड गायब केले आहे. शिवाय तो त्याच्यासोबत असलेल्या मित्रांचे मोबाईल नंबरही देत नसून पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत आहे.

खुनाच्या वेळी जायभाये सोबत कारमध्ये असलेले आरोपी विजय जौक, उमर पटेल आणि संकेत मचे, हे पफरार आहेत. पसार आरोपी आणि आरोपी जायभाये यांच्यात या हत्येविषयी कट शिजला होता का? याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपीकडून सीमकार्ड जप्त करायचे अाहे. तसेच मित्र आणि इतर माहिती मिळवायची आहे , त्यामुळे त्याला १० दिवस पोलीस कोठडी देण्याची विनंती पोलिसांनी केली. न्यायालयाने आरोपी संकेतला ४ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.