कणकवली नगरपंचायतवर प्रथमच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा झेंडा

कणकवली : पोलीसनामा ऑनलाईन
कणकवली नगरपंचायत खासदार माजी मुख्यमंत्री तथा कोकणचा बुलंद आवाज नारायण राणेंच्या स्वाभिमान व राष्ट्रवादी आघाडीच्या ताब्यात गेल्याचे चित्र आहे.
कणकवली नगरपंचायतीत स्वाभिनमान पक्षाचे मोठे यश 17 पैकी 10 व राष्ट्रवादीचा एका प्रभागात विजइ झाला असून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे 37 मतांनी विजयी झाले आहेत.

भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर पराभूत
आमदार नितेश राणे व माजी खासदार निलेश राणे यांच्या यशस्वी डावपेचांनी कणकवली स्वाभिमानाची आगे कूच सुरु. या निकालामुळे स्वाभिमान राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला.

स्वाभिमान १०
राष्ट्रवादी १
भाजप ३
सेना ३

प्रभाग क्रमांक आणि विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे

1- कविता राणे स्वाभिमान

2- प्रतीक्षा सावंत स्वाभिमान

3- अभिजित मुसळे स्वाभिमान

4- आबिद नाईक राष्ट्रवादी

5- मेघा गांगण स्वाभिमान

6- सुमेधा अंधारी भाजप

7- सुप्रिया नलावडे स्वाभीमान

8- उर्मी जाधव स्वाभीमान

9- मेघा सावंत भाजप

10- माही परुळेकर शिवसेना

11- विराज भोसले स्वाभिमान

12- गणेश हर्णे स्वाभिमान

13- सुशांत नाईक शिवसेना

14- रुपेश नार्वेकर भाजप

15- मानसी मुंज शिवसेना

16- संजय कामतेकर स्वाभिमान

17- रवींद्र गायकवाड स्वाभिमान