कर्तव्य बजावत असलेल्या पोलीसांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत: पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा

सांगली: पोलीसनामा आॅनलाईन
भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तासगांव येथे सोमवारी रात्री मारामारी झाली. यावेळी दंगलखोरांना रोखण्याचे कर्तव्य बजावत असताना पोलींसावर जिवघेणा हल्ला करण्यात आला. याप्रकरणी संबंधीत दंगलखोरांवर खुनाचा प्रयत्न आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशी माहिती पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांनी दिली.

तासगाव येथे दोन गटात मारामारी झाल्याचे समजताच मी त्या ठीकाणी गेलो होतो. पोलीसांवर हल्ला केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याचेही सांगितले. दोन्ही गटातील दंगलखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेल्या कोणालाही मी शिवीगाळ किंवा मारहाण केली नाही. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. पोलीसांविरोधी हा मुद्दाम कट रचला जात असून आंदोलनाद्वारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा दबावाला पोलीस घाबरणार नाहीत. तर, कर्तव्य बजावत असलेल्या पोलीसांवर केलेले हल्ले कधीही खपवून घेतले जाणार नाहीत. असेही अधीक्षक सुहेल शर्मा यांनी सांगितले.