काचबिंदू टाळण्यासाठी रुग्णांनी योग्य वेळेत तपासणी करावी : डॉ.रमेश भांगे

पुणे पोलीसनामा ऑनलाइन :
जागतिक काचबिंदू दिनाचे औचित्य साधत, नेत्रतज्ञ डॉ.रमेश भांगे यांच्याशी अमित भिडे यांनी संवाद साधून काच बिंदू या आजारा विषयी अधिक माहिती जाणून घेतली. सद्याच्या स्थितीला काच बिंदू च्या रुग्णांमध्ये वाढ होत असून या गंभीर आजारामुळे कायमचे अंधत्व देखील येण्याची शक्यता असते. त्या पार्श्वभूमीवर काच बिंदू होऊ नये. या विषयी रुग्णांनी डोळयाची योग्य वेळेत तपासणी करून घ्यावी. असे आवाहन डॉ.रमेश भांगे यांनी केले.