कामावरून काढून टाकल्याने,कामगाराने दारूचे नळ चालू ठेवले

चंदीगड पोलीसनामा ऑनलाईन :
चंदीगड येथील दारूच्या कंपनीतून एका कामगाराला कामावरून कमी केल्याने त्याने मनात राग धरून कारखान्याचे दारूच्या टाक्याचे नळ की खुले ठेवले आहे. या प्रकरणी कंपनीतील रिशीपाल सिंग याने मुन्ना (वय २०) व्यक्तीस अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दिवाळीत मुन्नाला कंपनीने कामावरुन अचानक काढले.त्यानंतर कंपनी प्रशासनासोबत अनेक वेळा पत्रव्यवहार करून कामावर घेण्याची विनंती केली. मात्र तरी देखील कामावर न घेतल्याने त्याचे आर्थिक नुकसान झाले,असे आरोपीने सांगितले.या रागातून कंपनीतील दारूच्या टाकीचे नळ चालू ठेवल्याची कबुली दिली.या घटनेमुळे एक लाख लीटरपेक्षा अधिक दारू वाया गेल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.