किरकोळ कारणावरून पेट्रोल पंप मालक आणि कर्मचाऱ्याला मारहाण

चाकण : पोलिसनामा ऑनलाईन

चाकण परिसरातील आसखेड येथे पेट्रोल भरण्यावरून झालेल्या वादात वाहनचालकाने कर्मचारी आणि पेट्रोल पंप मालक यांना लाथा बुक्क्यांनी दोघांनी मारहाण केली आहे.कैलास लिंबोरे वय-२५ अस मारहाण करण्यात आलेल्या फिर्यादीचे नाव आहे. ही घटना रात्री आठ च्या सुमारास आसखेड रस्त्या लगत असलेल्या एच,पी पेट्रोल पंपावर घडली.याप्रकरणी चाकण पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ते अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी रात्री आठच्या सुमारास आरोपी संदीप लिंबोरे,सचिन लिंबोरे हे आसखेड रस्त्याच्या लगत असलेल्या एच,पी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यास गेले होते.त्यावेळी गाडी मध्ये पेट्रोल लवकर भरलं नाही या कारणावरून कर्मचारि आणि पेट्रोल पंप मालक कैलास लिंबोरे यांना दोघांनी दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली तसेच ऑफिस दगडाने तोडफोड केली.याप्रकरणी पेट्रोल पंप मालक कैलास लिंबोरे यांनी चाकण पोलिसात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आले आहे.अद्याप दोघांना अटक करण्यात आलेली नाही.अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत.