केंद्राच्या जलवाहतूक योजनेत मुळा मुठा नदीचा समावेश : खासदार अनिल शिरोळे

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या जलवाहतूक योजनेत मुळा आणि मुठा या दोन नद्याचा समावेश करण्यात आला असून या नदीमधून येत्या काळात जलवाहतूक होईल.असे संकेत खासदार अनिल शिरोळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी खासदार अनिल शिरोळे म्हणाले की,पुणे शहरात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्प येत्या काळात राबवण्यात येणार आहे.त्यातील केंद्र सरकारच्या अंतर्गत जलवाहतूक योजना देशात राबवण्यात येत आहे.या जल वाहतूक योजनेत देशातील अनेक नद्याचा समावेश करण्यात आला आहे. पुण्यातील मुळा आणि मुठा नदीचा समावेश केला जावा.यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सोबत पत्रव्यवहार केला.

त्यानुसार केंद्राच्या जलवाहतूक योजनेत मुळा आणि मुठा नदीचा समावेश करण्यात आला असून त्यामुळे येत्या काळात लवकरच जलवाहतूकीला सुरुवात होईल.असे त्यांनी सांगितले.