केडगाव पारगाव जि.प.गटासाठी पावणे नऊ कोटीचा निधी

जि.प.महिला बाल कल्याण सभापती राणी शेळके यांची माहिती

दौंड : पोलिसनामा ऑनलाईन
जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती राणी शेळके यांच्या केडगाव पारगाव जिल्हा परिषद गटासाठी सुमारे आठ कोटी ७६ लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झाला आहे. यात केडगाव येथील पेयजल योजनेसाठी साडे तीन कोटी तर दलित वस्ती सुधार योजनेसाठी पावणे तीन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती जि.प. महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके यांनी दिली आहे.

संपूर्ण दौंड तालुक्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आला असून एकट्या केडगाव-पारगाव गटाच्या पाणी पुरवठा योजनेसाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतुन केडगाव गावठाण, आंबेगाव पुनर्वसनसाठी एक कोटी ३८ लाख, निंबाळकर वस्तीसाठी ६२ लाख, हंडाळवाडीसाठी ४८ लाख, देशमुख मळ्यासाठी ३९ लाख, धुमळीचा मळ्यासाठी ६९ लाख, असा केडगावसाठी सुमारे तीन कोटी पन्नास लाखांचा निधी आणला असून
दलित वस्ती सुधार योजनेमध्ये नानगाव, पारगाव, देलवडी, पिंपळगाव, लडकतवाडी,एकेरीवाडी, गलांडवाडी, वाखारी, नाथाचीवाडी, केडगाव, दापोडी या गावांसाठी दोन कोटी ८८ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

मुळा मुठा संगम ते गलांडवाडी रस्ता सुधारणेसाठी ४० लाख, वाखारी कुंभार वस्ती सुधारणेसाठी ४० लाख निधी मंजूर करण्यात आला आहे. लडकतवाडी नवीन आरोग्य उपकेंद्र बांधण्यासाठी ७७ लाख ६४ हजार रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. दापोडी येथील अंतर्गत रस्त्यासाठी तीन लाख रुपये तर केडगाव येथील सावतामाळी मंदिर सभागृहासाठी ७ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

शाळा दुरुस्तीसाठी वाकडापूल शेळकेवस्ती एक लाख, केडगाव स्टेशन पाच लाख, वाखारी गावठाण १.५० लाख, देलवडी गावठाण पाच लाख, पारगाव गावठाण पाच लाख, नाथाची वाडी गावठाण तीन लाख असा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या व्यतिरिक्त केडगाव पारगाव गटातील स्मशानभूमी दुरुस्ती,शाळा दुरुस्ती, रस्ते, साठवण बंधारे,आरोग्य उपकेंद्र, हॉल, अशा विविध कामांसाठी एकूण आठ कोटी ७६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती राणी शेळके यांनी दिली.

विशेष सहकार्यामुळे गटाचा विकास : राणी शेळके
महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके यांनी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी आमदार, पीडिसीसीचे अध्यक्ष रमेश थोरात व जि.प अध्यक्ष विश्वासराव देवकाते यांच्या विशेष सहकार्याने हा निधी मंजूर झाला असून यामुळे या परिसरातील अडचणी दूर होऊन महत्वाच्या गरजा आता पूर्ण होणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती राणी शेळके यांनी दिली.