Purandar : पुरंदर तालुका कॉंग्रेस शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी प्रल्हाद गिरमे तर सचिवपदी जालिंदर घाटे

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन – (संदीप झगडे)  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरंदर – हवेलीचे (Purander) आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली, तसेच महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस व महाराष्ट्र कॉंग्रेस शिक्षक सेलचे प्रभारी प्रा.प्रकाश सोनावणे त्याचप्रमाणे सुजाता चौखंडे माळी उपाध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस शिक्षक सेल यांच्या सूचनेवरून व संमतीने पुरंदर (Purander) तालुका कॉंग्रेस शिक्षक सेलच्या अध्यक्षपदी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड संचलित जिजामाता हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज जेजुरी या विद्यालयाचे उपशिक्षक प्रल्हाद रामचंद्र गिरमे यांची तर सचिवपदी डॉ.पतंगराव कदम माध्यमिक विद्यालय दौंडज या विद्यालयाचे उपशिक्षक जालिंदर घाटे यांची निवड करण्यात आल्याची माहिती पुणे जिल्हा कॉंग्रेस शिक्षक सेलचे अध्यक्ष रामप्रभू पेटकर यांनी दिली.

यावेळी त्यांना निवडीचे पत्र पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष व पुरंदर तालुका प्राथमिक ,माध्यमिक शिक्षक – शिक्षकेतर संघटनेचे समन्वय समितीचे अध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर,पुणे जिल्हा शिक्षक कॉंग्रेस सेलचे अध्यक्ष रामप्रभू पेटकर, शिक्षक नेते महादेव माळवदकर पाटील, वसंतराव ताकवले , सुधाकर जगदाळे, संदीपआप्पा जगताप यांच्या हस्ते देण्यात आले.

यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष इस्माईल सय्यद, टी.डी.एफचे अध्यक्ष संजय भिंताडे,शिक्षक समितीचे अध्यक्ष अनिल चाचर,शिक्षक नेते बाळासाहेब झगडे,टी.डी.एफचे कार्याध्यक्ष बाबुराव गायकवाड,शांगृधर कुंभार,दिलीप पापळ, केंद्रप्रमुख संघटनेचे राजेंद्र जगताप,राजेंद्र कुंजीर, शिक्षक नेते संदीप कदम, सुनिल लोणकर,पांडुरंग जाधव अध्यक्ष शिक्षकेतर संघटना, शिक्षक नेते नंदू चव्हाण,गणेश कामठे,गणेश लवांडे अध्यक्ष पुरंदर (Purander) तालुका प्राथमिक शिक्षक संघ,संजयआबा जाधवराव,दत्तात्रय कदम उपस्थित होते.

कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष प्रल्हाद गिरमे (जेजुरी),सचिव जालिंदर घाटे ( दौंडज),सहसचिव बाबुराव गायकवाड ( जवळर्जुन ), कार्याध्यक्ष रमेश बोरावके ( खळद) ,उपाध्यक्ष तानाजी शिर्के ( मांढर), सिद्राम कांबळे ( माळशिरस), महिला प्रतिनिधी वर्षा देसाई, सुनिता जगताप (जेजुरी), मार्गदर्शक प्राचार्य नंदकुमार सागर,प्राचार्य उत्तमराव निगडे, प्राचार्य शिवाजीराव कोलते, प्राचार्य रामदास शिंदे.