कोल्हापूरमध्ये एसटीला शॉर्टसर्किटमुळे आग

कोल्हापूर : कोल्हापूर-गारगोटी एसटीला आग आगली. या आगीत बस जळून खाक झाली. हणबरवाडी नजीक ही घटना घडली. शॉर्टसर्किटमुळे ही आग आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे.

यात जीवितहानी झाली नाही. मात्र धावपळ उडाल्याने काही प्रवासी किरकोळ जखमी झाले.

कोल्हापूरच्या हणबरवाडी घाटात बस आली असता अचनाक गाडीला आग लागली. एसटीतून प्रवास करणारे सर्व ४६ प्रवासी सुखरुप आहेत, अशी माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.