खेड पंचायत समितीच्या विस्तार आधिकाऱ्याला, 25 हजाराची लाच घेताना अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन

पुणे जिल्ह्यातील खेड पंचायत समितीच्या विस्तार आधिकाऱ्याने चौकशी अहवाल वरिष्ठांना तातडीने पाठवण्यासाठी 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पंचायत समिती विस्तार अधिकायास लाच घेताना रंगेहात पकडले आहे.
श्रीकांत दाजी दणाने (वय-46, रा.बी/9 ओम रेसिडेंसी, रामलिंग रोड, शिरूर ता. शिरूर जिल्हा पुणे) असे संबंधित विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे खेड तालुक्यातील चिंबली ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. तक्रारदाराने आणि चिंबळीच्या सरपंचांनी, उप-सरपंच यांनी केलेल्या कामाबाबत तक्रार केली होती. त्या नुसार उपसरपंचांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केल्याने त्यांची चौकशी चालू होती. त्यांचा चौकशी अहवाल वरिष्ठांना पाठविण्यासाठी विस्तार अधिकारी श्रीकांत दणाने या आधिकाऱ्याने तक्रारादाराकडे 25 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानुसार आज पंचायत समितीच्या आवारात सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या आधिकाऱ्यांनी लाच घेताना रंगेहात पकडले आहे.