गरजू रुग्णांना माफक खर्चात जेनेरिक औषधे मिळणार : डॉ. अजय चंदनवाले

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

वैद्यकीय उपचारात जेनेरिक औषधांचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी बै. जी. महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालय येथे केंद्र सरकारच्या निर्देशानुसार एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. केंद्र व राज्य सरकारचा आरोग्य विभाग, अन्न व आैषध प्रशासन, भरतीय वैद्यकीय परिषद ब्युरो आॅफ फार्मा पब्लिक सेक्टर व इंडियन मेडिकल एसोशिएशन एफ. आय. सी. सी. फेडरेशन व चेंबर आॅफ काॅमर्स अॅन्ड इंडस्ट्रिज यांच्या विद्यमाने ही परिषद भरवण्यात आली. परिषदेस पुणे व परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयाचे अध्यापक व पदव्यूत्तर विद्यार्थी यांसह फेडरेशन आॅफ इंडियन चेंबर आॅफ काॅमर्स अॅन्ड इंडस्ट्रिजचे उप संचालक चिराग जसानी उपस्थित होते.

यावेळी परिषदेमध्ये जेनेरिक औषधांची सुरक्षितता व उपयुक्तता या विषयीचे गैरसमज दूर करण्यात आले. केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी, औषधवैधक व औषधशास्त्राचे डॉक्टर यांच्यामध्ये चर्चासत्राचे आयोजित करण्यात आले होते. तसेच जेनेरिक औषधांविषयी वैद्यकीय तज्ञ व अध्यापकांमध्ये जागरूकता व्हावी, त्यांनी जेनेरिक औषधे रुग्णांना लिहून द्यावीत, या औषधांबाबत रुग्णांमध्ये जनजागृती करून जेनेरिक औषधांचा वापर करावा. अशी माहिती, अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवले यांनी दिली.

डॉ. संजय देशमुख (उपसंचालक, राज्य आरोग्य सेवा) , एस. बी. पाटील ( सह. आयुक्त, राज्य अन्न व औषध प्रशासन) आर.एन. नंदी, व धीरज शर्मा, ब्युरो आॅफ फार्मा पब्लिक सेक्टर(बीपीपीआय), डाॅ. अभय सराफ, (संचालक, सार्वजनिक आरोग्य, आयक्यूव्हीआयए) यांनी जेनरिक आैषधे व भारतीय जनआैषधी परियोजनेसंबंधी व्याख्याने दिली. यांसह डाॅ. दिलीप कदम, आैषधशास्त्र प्राध्यापक, विभाग प्रमुख यांनी चर्चासत्रात भाग घेतला.

या परिषदेत बै. जी. महाविद्याय व ससून सर्वोपचार रुग्णालयाचे उप अधिष्ठाता ( प्रशासन) डाॅ. मुरलीधर तांबे यांनी परिषदेबद्दल प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन आैषधशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डाॅ. रोहिणी जगताप यांनी केले.