गांजा विक्रीसाठी आलेले दोघेजण विश्रांतवाडी पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा आॅनलाईन

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना विश्रांतवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 40 हजार रुपये किंमतीचा चार किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी प्रसाद शशिकांत थोरात (20, रा.खडकपुरा, खाटीक गल्ली, वैराग, ता.बार्शी, जि. सोलापूर) व सुनील शशिकांत थोरात (28, रा.कलवड वस्ती, लोहगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार उत्तम कदम यांना खबऱ्या मार्फत धानोरी येथील 100 एकर परिसर येथे दोन व्यक्ती गांजा विक्री साठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी वेगवेगळी पथके नेमून दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले. आरोपी जवळ असलेल्या काळ्या रंगाच्या बागेची झडती घेतली असता त्यामध्ये 40 हजार रुपये किंमतीचा चार किलो गांजा आढळून आला.

वरील प्रकारची कारवाई पोलीस उप निरीक्षक विशाल मोहिते, पोलीस कर्मचारी उत्तम कदम, सुनील खंडागळे, वामन सावंत, विनायक रामाणे, प्रवीण भालचिम, सुभाष आव्हाड, विनायक मुधोळकर, प्रितम जंगम, शेखर खराडे, अशोक शेलार यांनी केली.