गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन
गांजा विक्री करणाऱ्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सहा किलो गांजा व एक टोयोटा मोटार अशा तेरा लाख ९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर त्यांचे दोन साथीदार पसार झाले आहेत.
अशओरस जीझस फारिया, जॉनी मिनिनो कलासो अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर कार्टन वाझ व नायझल अशी पसार झालेल्या दोघांची नाव आहेत. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक विकास जगन्नाथ भुजबळ यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास गंधर्व लॉन्स मंगल कार्यालयाचे अलीकडे लाटे यांच्या वॉशिंग सेंटरजवळ असलेल्या रस्त्यावर हे चौघे गांजा विक्री करत असल्याचे सहायक निरीक्षक भुजबळ यांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांन दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ एक लाख पस्तीस हजार (1,03,500 रु) किंमतीचा सहा किलो 900 ग्रॅम गांजा मिळून आला. त्यांच्याकडून गांजा व एक टोयोटा मोटार असा तेरा लाख नऊ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र त्यांचे दोन साथीदार तेथून पसार झाले.