गोरेगावमधील इंडस्ट्रियल इस्टेट गोडाऊनला भीषण आग

मुंबई: गोरेगाव येथील एका इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आज (बुधवारी) सकाळी भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 14 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आठ फायर इंजिन आणि सहा पाण्याचे बंब आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र, आग मोठी असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.

या आगीत इंडस्ट्रीयल इस्टेटमधील दोन गोदामे जळून खाक झाली आहेत. मात्र, कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग नेमकी कशामुळे लागली आहे याचे नेमके कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.