गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती गंभीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले आहे. पर्रीकर यांना स्टेज-4 चा स्वादुपिंडाचा कर्करोग झाला असून त्यांच्यावर मुंबईतील लीलावती रूग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

पर्रीकर यांना गुरूवारी (15 फेब्रुवारी) पोटदुखीच्या त्रासामुळे रूग्णालयात भरती करण्यात आले होते. लवकरच त्यांना डिस्चार्ज मिळेल व 19 फेब्रुवारीपासून गोव्या विधानसभेच्या होणा-या अधिवेशनात भाग घेतील असे सरकारी सूत्रांनी म्हटले होते.

पर्रीकर यांच्यावर लीलावती रुग्णालयातील प्रसिद्ध कॅन्सर तज्ज्ञ पी. जगन्नाथ उपचार करत आहेत. सध्या त्यांना लिक्विड डायटवर ठेवण्यात आले आहे.