चंदननगर येथे तरुणाचा पूर्ववैमनस्यातून खून

पुणे : एनपीएन्यूज नेटवर्क

पुणे – पूर्ववैमनस्यातून खराडी येथे तीन तरुणांनी मिळून एकावर धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना खराडी येथील थिटे वस्ती परिसरात शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून एकजण फरार आहे.

पवन बाबुराव कांबळे (19, खराडी,)असे मृताचे नाव आहे. तर अमर घाडगे व सुमित जाधव या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर किशोर शिंदे याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पवन कांबळे व तिघा आरोपी मध्ये एक वर्षांपूर्वी काही कारणावरून वाद झाले होते. त्या कारणावरून तिघांनी मिळून शुक्रवारी रात्री पवन कांबळे याच्यावर धारदार शस्त्राने वार करून खून केला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी दोघांना ताब्यात घेतले. मात्र एकजण अद्याप फरार आहे.