चलनाची अनपेक्षितपणे मागणी वाढल्याने तुटवडा : अरूण जेटली

नवी दिल्ली : वृत्तसंस्ठा

अचानक चलनाच्या मागणीत वाढली आहे. त्यामुळे तात्पुरती चलनाची टंचाई निर्माण झाली असून यावर त्वरित उपाय करण्यात येईल, अशी माहिती वित्तमंत्री अरूण जेटली यांनी दिली. देशातील पाच राज्यांमध्ये नोटाबंदीच्या काळाप्रमाणे चलन तुटवडा निर्माण झाल्यानंतर अर्थमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

आराम, महाराष्ट्र, बिहार, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व तेलंगणामध्ये बहुतांश एटीएममध्ये पैसे नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, असे वृत्त समोर आल्यानंतर वित्तमंत्र्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीनुसार, देशात ६ एप्रिलला १८.१७ लाख कोटी रुपयांचे चलन फिरत आहे. औद्योगिक तज्ज्ञांच्या मते या राज्यांमधील चलनाच्या तुटवड्यामागील कारण दोन हजाराच्या नोटांची साठवणूक असल्याचे सांगितले जात आहे.

संबंधित घडामोडी:

विविध राज्यांमध्ये नोटबंदीची पुनरावृत्ती