जमीन देण्याच्या बहाण्याने बिल्डरला पाच लाखांना गंडवले

निगडी : पोलीसनामा ऑनलाईन
बांधकाम करण्यासाठी जमीन देण्याच्या बहाण्याने दोन ठगांनी बिल्डर कडून पाच लाख रुपये घेतले. पैसे घेऊनही या ठगांनी बिल्डरला जमीन न देता पैशांचा अपहार केला. याप्रकरणी बिल्डरने निगडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

चंद्रशेखर गोकुळ नार्वेकर आणि पवार वकील असे ठगांची नावे आहेत. तर याप्रकरणी वेदांत बिल्डर्स अॅन्ड असोशिएशनचे लहानु यशवंत नरोटे (रा. लक्ष्मी तारा अपार्टमेंट, काळेवाडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि लहानु नरोटे हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. नरोटे ह बांधकाम व्यवसायिक असून त्यांना बांधकामासाठी जमीन शोधत होते. आरोपींनी त्यांना चिखली येथील जागा दाखवली. त्या जमीनीचे कागदपत्रे दाखवून नरोटे यांच्याकडून ४ लाख ८७ हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही जमीनचे खरीखत केले नाही. वारंवार त्यांच्याकडे तगादा लावूनही त्यांनी खरेदीखत केले नाही. त्यामुळे नरोटे यांना फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे करत आहेत.