‘जागतिक आरोग्य दिन’ विशेष; आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती

पुणे: पोलीसनामा आॅनलाईन

आरोग्य हिच सर्वात मोठी संपत्ती आहे. आज ७ एप्रिल जगतिक आरोग्य दिन. सध्याची जीवनशैली खुपच धावपळीची आहे, आणि वेळ स्वतःकरिता अतिशय कमी, यामधून सुवर्णमध्य साधून निरोगी राहता आलं तर! नेमकं हेच जाणून घेण्यासाठी आरोग्यदिनाचे औचित्य साधून पोलिसनामाचे प्रतिनिधी अमित भिडे यांनी प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. अर्चना रायरीकर यांच्याशी संवाद साधून संतुलित आहाराविषयी माहिती घेतली.

फास्ट-फूड, प्रकिया केलेल्या पदार्थां ऐवजी नेसर्गिक अन्नपदार्थ जसे फळं, हिरव्या पालेभाज्या, कडधान्य याचा आहारतज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाने जेवणात समावेश आणि नियमित व्यायाम हेच निरोगी राहण्यासाठी उत्तम आहे. असे मार्गदर्शन डॉ. रायरीकर यांनी केले.