जामखेडमध्ये सामाईक पडीक जमिनीच्या प्रश्नावरून मारहाण

जामखेड : ”सामाईक पडीक जमिनीची लेवल का करता,”असे विचारल्याने पाच जणांसह इतर पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके व लोखंडी पाइपने मारहाण केली. यात चार जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पाच जणांसह इतर पंधरा ते वीस जणांवर जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर खेत्रे, अनिल खेत्रे, धनेश खेत्रे व गजानन विष्णू म्हेत्रे अशी मारहाणीत जखमी झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी किशोर संभाजी खेत्रे (वय ३०) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, ‘आमची काझेवाडी तलावाजवळ शेतजमीन असून ही जमीन माझे वडील संभाजी काशीनाथ खेत्रे व चुलते यांच्या नावावर आहे. या जमिनीची आतापर्यंत चतु:सीमा टाकून वाटप झालेले नाही.
या जमिनीपैकी दत्तात्रय बन्सी म्हेत्रे यांनी आमची व इतर जमीनधारकांची परवानगी न घेता काही जमिनीची विक्री केली आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी या सामाईक जमिनीमधील चंदनाची दोन झाडे व नारळाचे एक झाड तोडून टाकले आहे. तसेच आरोपी दत्तात्रय म्हेत्रे यांनी बुधवारी (७ मार्च) जेसीबी आणून जमिनीपैकी पडीक असलेल्या जमिनीची लेवल करण्यास सुरुवात केली. या वेळी मी व माझे चुलत भाऊ यांनी विरोध केला व मी त्यांना, अद्याप जमिनीचे वाटप झालेले नाही, जमीन वाटप झाल्यावर लेवल करा, असे सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘ही आमची जमीन आहे.’ असे म्हणून दत्तात्रय म्हेत्रे यांचा मुलगा मुकुंद दत्तात्रय म्हेत्रे, शाम दत्तात्रय म्हेत्रे, संगीता दत्तात्रय म्हेत्रे, दत्तात्रय बन्सी म्हेत्रे व राजू दशरथ खेत्रे व इतर १५ ते २० अशा एकूण २० ते २५ जणांनी लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण केली. यानंतर आनोळखी व्यक्ती जीपमधूनन पळून गेल्या.