जुलै पासून तेरा अंकी मोबाईल क्रमांक

नवी दिल्ली : केंद्रिय दुरसंचार मंत्रालयाने जारी नव्या आदेशानुसार आता सर्व मोबाईल नंबर दहा अंकी ऐवजी जुलैपासून ते १३ अंकी होणार असल्याचे म्हटले आहे. या संबंधीचे आदेश मंत्रालयाकडून देशातील सर्व राज्यांना देण्यात आले आहेत.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुरसंचार मंत्रालयाच्या दिल्ली येथे झालेल्या बैठकीत १३ अंकी मोबाईल क्रमांक बाबत निर्णय झाला. आता आपल्याकडे दहा अंकी मोबाईल नंबर देण्यासाठी शिल्लक नाहीत. त्यामुळेच दहापेक्षा अधिक क्रमांकाची श्रेणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार एक जुलैपासून १३ अंकी मोबाईल नंबर दिले जाणार आहेत.

”दूरसंचार सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना १३ अंकी नंबरबाबतच्या सुचना लागू आदेश देण्यात आला आहे. त्यांनी आपली यंत्रणा अद्ययावत करावी असेही या आदेशात म्हटले आहे. तसेच जुने मोबाईल नंबरदेखील डिसेंबर २०१८ पर्यंत १३ अंकी करुन घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली,”जाणार असल्याचे बीएसएनएलचे वरिष्ठ महाप्रबंधक सुरेश प्रजापति यांनी सांगितले.

सध्या वापरात असलेल्या १० अंकी मोबाईल क्रमांकाला १३ अंकी कसे केले जाणार याबाबतचे कोणतेही स्पष्टीकरण अद्याप दिलेले नाही. त्याचबरोबर मोबाईल हॅण्डसेटची सिस्टिमदेखील १३ अंकी नंबरनुसार अपडेट केली जाणार आहे ज्यामुळे वापरकर्त्याला कोणतीही समस्या येणार नाही.