जुळ्यांच्या रुपात मातेला मृत मुलगा परत मिळाला

पुणे: पोलिसनामा आॅनलाईन

कर्करोग आणि ब्रेन ट्युमर ने मृत्यू झालेला प्रथमेश आज जगात नाही. पण, त्याचे शुक्रजंतू जतन केल्यामुळे त्यापासून आय व्ही एफ तंत्रज्ञान आणि सरोगसीमुळे त्याच्या शुक्रजंतुपासून एक मुलगा आणि मुलगी अशा जुळ्यांनी दोन दिवसांपूर्वी नगर रोडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये जन्म घेतला आहे.

27 वर्षीय प्रथमेश पाटील या तरुणाला दोन वर्षापूर्वी जर्मनीत असताना ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाचे निदान झाले. दरम्यान त्याला उपचारासाठी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण, त्याची प्राणज्योत 2016 ला मालवली. मात्र कृत्रीम गर्भधारणेद्वारे सह्याद्री रुग्णालयातील डॉ. सुप्रिया पुराणीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. प्रथमेश पाटील २०१३ रोजी इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करुन पुढील शिक्षणासाठी जर्मनी येथे गेला आणि तो तेथील एका कंपनीमध्ये रुजू झाला, अशी माहिती प्रथमेशची आई राजश्री पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्या पुढे म्हणाल्या की त्याला ब्रेन ट्युमरच्या ४ थ्या टप्प्याचे निदान झाले. परदेशातील नियमानुसार किमोथेरपीने देण्यात येणार्या व्यक्तीचे वीर्य कृत्रीमरित्या काढून वारसदारांसाठी गोठवले जाते. त्याप्रमाणे प्रथमेशचेही वीर्य गोठवले होते.

पुढील उपचारासाठी प्रथमेशला भारतात आणल्यानंतर त्यावर मुंबई येथील हिंदूजा रुग्णालयात ब्रेनट्युमरची शस्त्रक्रिया करण्यात आली. पण त्याचा २०१६ रोजी मृत्यू झाला. जर्मनी सरकारच्या नियमाप्रमाणे सर्व आवश्यक परवानग्या घेऊन एकुलत्या एक मुलाचे वीर्य भारतात आणले. मृत्यूने पाटील यांना त्याच्या आठवणीने ग्रासले होते. प्रथमेशला पुन्हा मिळवायचे असा निश्चय करत गोठवलेल्या वीर्याद्वारे स्वत:च त्याच्या मुलाला जन्म देण्याचे पाटील यांनी ठरवले. सर्व वैद्यकीय तपासण्यांनंतर त्या सरोगसीसाठी त्यांनी महिलेचा शोध सुरु केला. दरम्यान २०१७ रोजी त्यांच्या कुंटुंबातील एक विवाहित महिला कुत्रीम गर्भधारणेसाठी तयार झाली. सह्याद्री रुग्णालयातील स्त्री-रोग तज्ज्ञ डॉ. सुप्रिया पुराणीक यांच्या मदतीने संबंधीत ३५ वर्षीय महिलेवर कुत्रीम गर्भधारणेची यशस्वी प्रक्रिया केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी महिलेने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्या मुलांना नैसर्गिक रित्या जन्म दिला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील हा एक वेगळा योगायोग समाजला जात आहे.