जेष्ठ नेते माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या अंत्यदर्शनाला गर्दी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

जेष्ठ समाजवादी नेते माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे वयाच्या 88 व्या वर्षी काल पुण्यात निधन झाले असून दांडेकर पुलाजवळील साने गुरुजी भवन येथे त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी झाली आहे.

जेष्ठ समाजवादी नेते माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे काल पुण्यातील एका खासगी रुग्णालयात निधन झाल्यावर त्यांचे पार्थिव घरी नेण्यात आले.त्यानंतर आज सकाळी दांडेकर पुलाजवळील सानेगुरुजी भवनामध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले.यावेळी भाई वैद्य यांचे चिरंजीव अभिजित वैद्य आणि त्यांचे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळी नी हजेरी लावून अभिजित वैद्य यांचे सांत्वन करताना पाहाव्यास मिळाले.

आता यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि संध्याकाळी 6 ला वैकुंठात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.